"केंद्र सरकारचा निर्णय: 1 जानेवारीपासून काहींची रेशन कार्ड रद्द होणार"
भारत सरकारने रेशन कार्ड योजनेंतर्गत बनावट शिधापत्रिका वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेशन योजनेचा लाभ गरीब आणि गरजूंना मिळावा, यासाठी ईकेवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. देशातील 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळत असले तरी, काही जण पात्रतेशिवाय रेशन घेत असल्याचे समोर आले आहे.
1 जानेवारीपासून बनावट शिधापत्रिका ओळखून त्या रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र नागरिकांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांच्या शिधापत्रिका बंद होतील. ईकेवायसीसाठी जवळच्या रेशन दुकानात जाऊन POS प्रक्रिया करणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांची माहिती सादर करावी लागेल.
सरकारने बनावट रेशनकार्ड धारकांना रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत, कारण मोठ्या उत्पन्न गटातील लोक या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. यामुळे गरजू लोकांना लाभ मिळण्यात अडथळा निर्माण होतो. मुदत वाढवून फेब्रुवारी 2025 करण्यात आलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.
0 Response to ""केंद्र सरकारचा निर्णय: 1 जानेवारीपासून काहींची रेशन कार्ड रद्द होणार""
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!