"आतापासून महाराष्ट्रात 'देवेंद्र'पर्व: फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ"
मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुती सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याबद्दल सर्वत्र उत्सुकता होती. भाजपने 132 जागांवर विजय मिळवल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते.
त्यानंतर 13 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच 22 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. बॉलिवूड कलाकार, संत-महंत, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या निवडीसाठी काल विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठकीत निर्णय झाला होता. त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. स्वतः एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची विनंती केली आणि पाठिंब्याचे पत्र सादर केले.
आजच्या या ऐतिहासिक क्षणानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने 'देवेंद्र'पर्वाची सुरुवात झाली आहे.
0 Response to ""आतापासून महाराष्ट्रात 'देवेंद्र'पर्व: फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ""
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!