"2025: जागतिक लोकसंख्या 8.09 अब्ज, भारत पहिल्या स्थानावर"

"2025: जागतिक लोकसंख्या 8.09 अब्ज, भारत पहिल्या स्थानावर"

                   



जगाची लोकसंख्या: 2025 मध्ये भारत प्रथम स्थानी

भारताची लोकसंख्या दरवर्षी झपाट्याने वाढत असून, ती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. 2024 मध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये 71 दशलक्षची वाढ झाली असून, 1 जानेवारी 2025 रोजी जगाची लोकसंख्या 8.09 अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यूएस सेन्सस ब्युरोच्या अंदाजानुसार, ही संख्या 2024 च्या तुलनेत 71.1 दशलक्षांनी अधिक असेल.

सध्या 1.14 अब्ज लोकसंख्येसह भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनलेला आहे. भारताच्या खालोखाल 1.40 अब्ज लोकसंख्येसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर, 341 दशलक्ष लोकसंख्येसह युनायटेड स्टेट्स तिसऱ्या स्थानावर आहे.

लोकसंख्येचा वाढीचा वेग

2025 मध्ये दर सेकंदाला सुमारे 4.2 जणांचा जन्म आणि 2 जणांचा मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2023 मध्ये जगभरातील लोकसंख्या 75 दशलक्षांनी वाढली होती. युनायटेड स्टेट्समध्ये पुढील महिन्यांत दर 9 सेकंदाला एक जन्म आणि दर 9.4 सेकंदाला एक मृत्यू होईल, तसेच आंतरराष्ट्रीय स्थलांतराद्वारे दर 23.2 सेकंदाला देशाच्या लोकसंख्येमध्ये एक व्यक्तीची भर पडेल.

भारत आणि इतर देशांची लोकसंख्या

जुलै 2024 पर्यंत भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या स्थानावर कब्जा केला. त्यावेळी भारताची लोकसंख्या 141 कोटी होती. दुसऱ्या स्थानावर चीन असून, त्यांची लोकसंख्या 140.8 कोटी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या युनायटेड स्टेट्समध्ये 341 दशलक्ष लोकसंख्या आहे.

अमेरिकेतील लोकसंख्या वाढ

2020 मध्ये अमेरिकेची लोकसंख्या 9.7 दशलक्षांनी वाढली होती, ज्याचा वार्षिक दर 2.9% होता. मात्र, 2010 च्या तुलनेत ही वाढ कमी असून, 1930 नंतरचा हा सर्वात कमी वाढीचा दर असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

उपाययोजना गरजेच्या

जगभरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या ही एक गंभीर समस्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, आणि रोजगाराच्या क्षेत्रांवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे सरकारने अधिकाधिक लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय योजणे महत्त्वाचे आहे.

2025 च्या सुरुवातीस भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल, परंतु लोकसंख्या व्यवस्थापन हे मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अपरिहार्य ठरेल.





0 Response to ""2025: जागतिक लोकसंख्या 8.09 अब्ज, भारत पहिल्या स्थानावर""

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article