"लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट… मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?"

"लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट… मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?"


 

जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, पाच महिन्यांत दरमहा ₹1500 प्रमाणे एकूण ₹7500 कोट्यवधी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, काही विरोधकांनी ही योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याचा आरोप केला होता. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर महिलांच्या मनात डिसेंबरच्या हप्त्याविषयी प्रश्न निर्माण झाले होते.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, त्या चालू ठेवण्याचं आमचं ठाम धोरण आहे. योजनांचा अर्थसंकल्पीय भार आहे, पण आम्ही योग्य नियोजन करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यांमध्ये लवकरच जमा होईल." तसेच, ही योजना फक्त निवडणुकीपुरती नसून सातत्याने सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही योजनेबाबत अपडेट्स दिल्या. त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं की, "विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १२.८ लाख महिलांना सन्मान निधी वितरित होणार आहे." मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली योजना यशस्वीपणे राबवली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

या घोषणांमुळे महिलांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली असून, योजना सातत्याने सुरू राहील याबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे.

0 Response to ""लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट… मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?""

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article