"EPFO सदस्यांसाठी खुशखबर! पैसे काढतानाही फायदा, जमा रक्कमेवर अधिक व्याजाचा लाभ"
EPFOने देशातील जवळपास 7.50 कोटी सक्रिय सदस्यांना दिलासा देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे जमा करतानाच नव्हे तर पैसे काढतानाही अधिक व्याज मिळणार आहे. क्लेम सेटलमेंटसाठी व्याजदरात सुधारणा करून, अर्जाच्या तारखेपर्यंत व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे बदल?
पूर्वी, ईपीएफ अर्जांवर फक्त मागील महिन्यापर्यंतचे व्याज मिळायचे. मात्र, नवीन नियमानुसार, क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याज दिलं जाईल. यासाठी 1952 च्या ईपीएफ योजना नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये प्रकाशन झाल्यानंतर हे नियम लागू होतील.
नवीन नियमांची अंमलबजावणी:
- सेवा निवृत्तीवेळी संपूर्ण रक्कम काढण्यास
- 55 व्या वर्षी निवृत्ती घेतल्यास
- अपंगत्व किंवा दोन महिने बेरोजगार राहिल्यास
या परिस्थितीत नवीन नियमानुसार अधिक व्याजाचा लाभ दिला जाईल.
10 वर्षांच्या नोकरीनंतर पेन्शन हक्क:
EPFO सदस्य जर 10 वर्षे सातत्याने योगदान करत राहिले, तर ते पेन्शनसाठी पात्र ठरतील. ही पेन्शन 58 व्या वर्षी मिळते, मात्र 50 व्या वर्षानंतर पेन्शन घेतल्यास कपात होईल.
UAN लिंकिंगसाठी मुदतवाढ:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी UAN सक्रिय करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे सदस्यांना या प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळ मिळेल.
या बदलांमुळे EPFO सदस्यांना पैसे काढतानाही मोठा फायदा होणार असून, प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
0 Response to ""EPFO सदस्यांसाठी खुशखबर! पैसे काढतानाही फायदा, जमा रक्कमेवर अधिक व्याजाचा लाभ""
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!