"शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, नेमकं काय चर्चा झाली?"

"शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, नेमकं काय चर्चा झाली?"

 

आज मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, या सोहळ्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

फडणवीस यांनी पवारांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यासाठी हा फोन केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी फडणवीस यांना कळवलं असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

आझाद मैदानावरील या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच इतर राज्यांचे काही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

0 Response to ""शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, नेमकं काय चर्चा झाली?""

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article