"‘या’ दिवशी होणार इतर मंत्र्यांचा शपथविधी; कुणाला मिळणार किती मंत्रिपदे? शिवसेना नेत्याचा मोठा खुलासा"
"११ डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; ३३ जणांचा शपथविधी होणार"
फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार येत्या ११ डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारावेळी ३३ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी यासंदर्भात भाष्य करत सांगितले की, आज फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वेळ मर्यादित असल्यामुळे उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी ११ डिसेंबरला होईल.
गोगावले यांनी स्पष्ट केले की, कोणाला कोणती खाती मिळणार यावर अद्याप चर्चा सुरू आहे आणि हा तिढा लवकरच सुटेल. एकनाथ शिंदेंनी मांडलेल्या मागण्यांवरही दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल. भविष्यात सकारात्मक निर्णय घेऊन सत्तेत येणाऱ्या नेत्यांचा पक्षाला फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांच्यावर टीका करत गोगावले म्हणाले, "संजय राऊत बोलतच राहावेत, कारण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आम्हाला फायदाच होतो." विरोधकांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिले असून उपस्थित राहायचे की नाही, हे त्यांना ठरवायचे आहे.
0 Response to ""‘या’ दिवशी होणार इतर मंत्र्यांचा शपथविधी; कुणाला मिळणार किती मंत्रिपदे? शिवसेना नेत्याचा मोठा खुलासा""
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!